Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

शिरोळमध्ये सात तरुणांनी संगनमताने तरुणाचा खून — जुन्या वादातून घडली थरारक घटना, सातही आरोपी अटकेत

 शिरोळ (जि. कोल्हापूर), दि. ९ जून : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांनी मिळून एका तरुणावर दगड व कोयत्याने अमानुष हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरोळ तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


फिर्यादी अमोल संतोष सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक दशरथ मगदूम (वय २०, रा. शिवाजीनगर, शिरोळ) याच्यावर परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे (सर्व रा. शिरोळ) या सातजणांनी एकत्र येऊन कुरुंदवाड रस्त्यावरील तीन तिकटीजवळील शेताजवळ हल्ला केला.

परवेज शेख याने दीपकला कुरुंदवाडला नेण्याच्या बहाण्याने शेताजवळ नेले. यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारला आणि अन्य साथीदारांनी त्यास शेतात ओढत नेऊन कोयत्याने आणि दगडांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला. रोहन कांबळे याने कोयत्याने वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांनी फिर्यादी अमोल सावंत यांनाही धमकी दिली.

गंभीर जखमी दीपकला तत्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पंचनामा करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर करत आहेत.

या घटनेमुळे शिरोळ परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन आणि तरुण वयातील मुलांचे व्यसनाधीनतेकडे झुकणे व गुन्हेगारीकडे वळणे हे समाजासाठी चिंताजनक बाब असून, अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments