शासनाच्या परिपत्रकानुसार आज सांगली येथील जिल्हा सरकारी वकील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी जिल्हा सरकारी वकील अँड. प्रमोद भोकरे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. अशोक वाघमोडे, अँड. सौ. रश्मी नरवाडकर आणि अति. अभियोक्ता संचालक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास सर्व सहाय्यक सरकारी वकील, कार्यालयीन कर्मचारी, पोलीस स्टाफ, सांगली वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक सरकारी वकील अँड. बाळासाहेब देशपांडे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचा ऐतिहासिक दृष्टिकोन मांडताना त्याचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांच्या मनोगतातून शिवकालीन संस्कारांची प्रेरणा सर्वांना मिळाली.
कार्यक्रमास केंद्रीय सरकारी वकील अँड. आनंद देशपांडे, अति. सरकारी वकील अँड. आरती देशपांडे, सौ. मेघा पाटील, सौ. उज्ज्वला करवते, अँड. रियाज जमादार, अँड. माधव कुलकर्णी, अँड. शैलेश हिंगमिरे, अँड. दीपक कांबळे, अँड. नितीन नरवाडकर, वकील संघटनेचे सचिव अँड. दीपक कदम, सदस्य अँड. मुरलीधर खरात, पोलीस पैरवी अधिकारी श्री. अशोक तुराई आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments