"गांजा विक्रीसाठी आले, पण पोलीस होते तयार!"
विश्रामबाग पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजाच्या तस्करीप्रकरणी तिघा तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ₹४७,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१३ जून रोजी दुपारी, सांगली शहरात काही संशयित तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना गोपनीय सूत्रांद्वारे मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शहरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे –
-
श्रेयस पाटील, रा. सावळज, जि. सांगली
-
अविष्कार माळी, रा. गोटखिंडी, ता. वाळवा
-
मयूर घारी, रा. गोटखिंडी, ता. वाळवा
पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातून ओला गांजा, मोबाईल फोन, व इतर साहित्य मिळून आले असून, एकूण मुद्देमालाची किंमत ₹४७,०००/- इतकी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सचिन गोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments