मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये कर्मचारी विविध त्रासांनी त्रस्त झाले असून, व्यवस्थेतील अनागोंदीमुळे रुग्णांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रुग्णालयातील नोंदणी विभागात नागरिकांची दखल न घेतल्याचे प्रकार सातत्याने घडत असून, एक्स-रे, एमआरआय व सिटी स्कॅन यांसारख्या तपासण्यांसाठी पैसे भरावे लागत आहेत. विशेष म्हणजे, या टेस्टसाठी संबंधित यंत्रणा रुग्णालयात उपलब्ध असूनसुद्धा रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्याही दिवसेंदिवस वाढत असून त्यांना महिनोंमहिने पगार न मिळाल्याने ते अक्षरशः वैतागले आहेत. तीन-तीन महिने पगार रखडल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे.
या सर्व प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. संजय बापू होनमाने यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “जर तात्काळ उपाययोजना न केल्यास, आंदोलनाचे तीव्र स्वरूप हाती घेण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणाकडे आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमध्येून आणि रुग्णांमध्येून जोर धरू लागली आहे.
0 Comments