Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

१६ तासांत उमदी पोलिसांचा अफलातून तपास; १२.७६ लाखांची बनावट जबरी चोरी उघड

 दि. ०२ जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता ते १०.०० वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा ते उमदी रोडवर आरटीओ चेकपोस्टच्या पुढे, उमदी गावाच्या दिशेने जात असताना एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली होती. मात्र उमदी पोलिसांनी अवघ्या १६ तासांत ही "बनावट जबरी चोरी" असल्याचा उलगडा करत १२,७६,८०० रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.


घटनेचा बनाव

फिर्यादी प्रमोद शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, वाटेत गाडी थांबवली असता एक स्विफ्ट कार आली. त्यामधून उतरलेल्या तीन इसमांनी त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारावर हल्ला करत गाडीतील १२ लाख ७६ हजार ८०० रुपये जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

तपासातील धक्कादायक सत्य
तपास अधिकाऱ्यांनी कौशल्याने चौकशी केली असता प्रमोद शिंदे यांना रक्कम मालक फारुख यांनी दिली असल्याचे समोर आले. मात्र एवढ्या मोठ्या रकमेचा हव्यास झाल्याने, त्यांनी मित्र सिद्धेश्वर ऊर्फ दादा डांगे, तौफिक मणेरी व अक्षय यांच्याशी संगनमत करून जबरी चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले. सर्व आरोपींनी रक्कम आपसात वाटून घेण्याचा कट आखला होता.

संपूर्ण रक्कम व गाडी हस्तगत
पोलिसांनी साक्षीदार व आरोपींच्या मदतीने संपूर्ण रक्कम १२.७६ लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे. चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

पोलीस पथकाचे कौतुक
सदर गुन्ह्याचा अवघ्या १६ तासांत पर्दाफाश करणे ही उमदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेची साक्ष आहे. पोउनि श्री. बंडू साळचे यांच्या नेतृत्वाखाली हा तपास यशस्वीरित्या पार पडला.

Post a Comment

0 Comments