तिरोडा तहसीलमधील नवेगाव खुर्द येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका २२ जून रोजी पार पडल्या. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले तर १ उमेदवार बिनविरोध निवडून आला. यानंतर २२ जुलै रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.
या निवडीत दीपक प्रेमलाल पटेल हे चौथ्यांदा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांच्या सोबत उपाध्यक्षपदी राजेंद्र देवदास पटेल यांची निवड करण्यात आली. दोन्ही नेत्यांच्या निवडीने संस्थेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या निवडणूक प्रक्रियेला उपस्थित असलेल्यांमध्ये श्रीधर बिसेन, गजराज पटेल, होशीलाल पटेल, हेमराज पटेल, दीनानाथ पटेल, मंगरू पटेल, प्रीतम ठाकरे, पंढरी भलाई, भीमा भोयर, छाया पटेल, सरिता पटेल आणि निवडणूक निर्णय अधिकारी एल. डी. शहारे यांचा समावेश होता.
नवीन अध्यक्ष दीपक पटेल आणि उपाध्यक्ष राजेंद्र पटेल यांचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले. संस्थेच्या विकासासाठी नवे निर्णय आणि योजनांची आखणी करण्यात येईल, अशी अपेक्षा सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली.
0 Comments