Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

तिरोडा तालुक्यात वडिलांच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

 गोंदिया (प्रतिनिधी):

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाटा मार्गावरील सातोना गावाजवळ आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मुसळधार पावसात वीज पडून झाड कोसळल्याने मोटारसायकलस्वार वडिलांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या सोबत असलेला मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य जिवचंद यादोराव बिसेन (वय ४६) हे आपल्या मुलासोबत सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिरसी फाटा येथे मोटारसायकल (MH35 AP 9370) ने शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. सातोना पावर हाऊस वळणावर अचानक वीज पडल्याने एक झाड मोडून खाली कोसळले आणि दुर्दैवाने बिसेन यांची मोटारसायकल नेमकी त्या झाडाखाली आली.

या दुर्घटनेत जिवचंद बिसेन यांच्या अंगावर झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला त्यांचा मुलगा चिराग जिवचंद बिसेन (वय १६) याच्या पायाला, कमरेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यास तातडीने गोंदिया येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

आज सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट सुरू होता. त्यातच ही अपघाताची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास तिरोडा पोलीस करत आहेत.


N24 मराठी : गोंदिया प्रतिनिधी : अमरदिप बडगे 


Post a Comment

0 Comments