गोंदिया (प्रतिनिधी) : युवा नेते रविकांत बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील राणी अवंतीबाई लोधी स्मारकाजवळ जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना व समाज बांधवांकडून हा दिवस सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. यंदाही तिरोडा शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि ढोल-ताशांच्या गजरात समाज बांधव सहभागी झाले.
या रॅलीचे तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. सहभागी बांधवांना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी अल्पोहाराचे वाटप करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आशिष येरपुडे, विजय बुद्धे, जॉनी सैय्यद, मंगेश गेडाम, टिपू सैय्यद, राजेश गोटफोडे, रंजित बागडे, बॉबी वालदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments