मिरज (प्रतिनिधी) – मिरज रेल्वे स्थानकावर झालेल्या वादातून एका तरुणाचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव सतीश मोहिते (वय ३२) असे आहे.
सतीश मोहिते आणि त्याचा मित्र हे दोघेही भंगार गोळा करण्याचे काम करतात. मंगळवार रात्री उशिरा, मिरज रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर, दारूच्या नशेतून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. या वादावादीदरम्यान सतीशला त्याच्या मित्राने जोरदार धक्का दिला, ज्यामुळे तो रेल्वे रुळावर पडला. पडताना त्याचे डोकं लोखंडी रुळावर आपटले आणि तो जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments