मिरजेतील कृष्णाघाट रोडवर दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात एक तरुण दुर्दैवी मृत्यूमुखी पडल्याची घटना आज घडली.
मयत दुचाकीस्वार हा कर्नाटक राज्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार हा अर्जुनवाडकडून मिरजेकडे येत असताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
अपघातानंतर चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनास्थळी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments