इचलकरंजी-शहापूर येथे पत्नीच्या नादाला लागल्याच्या कारणावरून पतीने मित्राच्या मदतीने मित्रालाच दगडी वरवंट्याने ठेचून ठार मारल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विनोद आण्णासो घुगरे (वय 32, रा. गल्ली नं. 3, गणेशनगर, शहापूर) असे खून झालेल्या तरुणाचे आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
दगडी वरवंट्याने डोक्यात हल्ला करून विनोद आण्णासो घुगरे (वय ३२) या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहापूर परिसरात खळबळ उडाली असून, मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि मयताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे (वय ३८) आणि संजय दशरथ पागे (वय ३६) (दोघेही रा. गल्ली नं. तीन, गणेशनगर, शहापूर) यांनी रागाच्या भरात विनोद आण्णासो घुगरे (वय ३२, रा. शहापूर) या तरुणाची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विनोद घुगरे आणि आरोपी संतोष व संजय पागे हे मित्र होते. विनोद हा गणेशनगर परिसरात आपल्या मित्रांसोबत राहत होता. दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात संतोषच्या पत्नीच्या नावावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात संतोष व संजय या दोघा भावांनी घरातील दगडी वरवंट्याने विनोदच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने विनोदचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी मयत विनोदची बहीण वनिता सचिन बोरगे (रा. गणेशनगर, शहापूर), यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments